MAHARASHTRA POLITICS : संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी बांधले शिवबंधन

464 0

मुंबई : संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज असलेले अनिल राठोड यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज स्वतः उद्धव ठाकरे यांनी अनिल राठोड यांच्या हातात शिवबंधन बांधले आहे. मातोश्री निवासस्थानी आज हा प्रवेश पार पडला आहे.

यावेळी शिवसेना नेते अनंत गीते आणि खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढले आहे. रोज दिग्गज आणि साधी माणसं शिवसेनेत येत आहेत. वेगवेगळ्या विचारांची माणसं येत आहेत त्यामुळे शिवसेना होती त्यापेक्षा अधिक मजबूत होत आहे.” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!