Maharashtra politics : ‘मित्र’ च्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांच्या नियुक्तीने नवीन वाद; विरोधकांनी उठवली टिकेची झोड, वाचा सविस्तर प्रकरण

254 0

Maharashtra politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयावरून वादंग निर्माण होत आहेत. या ना त्या कारण सातत्याने राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणी आणि उलथापालत होतेच आहे. यामध्ये आता भर पडली आहे ती ‘मित्र’ च्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांच्या नियुक्तीने.

सर्वात प्रथम पाहूयात ‘मित्र’ काय आहे ?

केंद्र सरकारच्या धरतीवर महाराष्ट्रामध्ये नीती आयोगाप्रमाणेच महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था Maharashtra Information and Transformation Institute स्थापन करण्यात आली आहे. यालाच मित्र असे म्हटले जाते. या ‘मित्र’ च्या स्थापनेनंतर उपाध्यक्षपदी अजय अशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाद का ?

असे म्हटले जाते आहे की खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच आग्रहास्तव आशर यांची नियुक्ती मित्रच्या उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे. याचाच समाचार अंबादास दानवे यांनी एक ट्विट करून घेतला आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे आता भाजपची चांगलीच गोची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. हा व्हिडिओ पाहुयात..

“तुम्हाला तुमच्याच व्हिडियोची आठवण करून द्यावी वाटली. ज्या अजय आशर यांच्यावर आपण आरोप केला, ते आशर तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढले की तुमच्या पक्षाला ‘खोके दर्शन’ झाले? कारण त्यांना तुम्ही सत्तेचा लाभार्थी करून टाकलं!”

एकंदरीतच अजय आशर यांच्या नियुक्तीमुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!