Deputy CM Manish Sisodia : उपमुख्यमंत्र्यांसह 13 जणांविरोधात लुकाऊट नोटीस जरी ; देश सोडण्यास मनाई

450 0

दिल्ली : दिल्लीच्या नव्या एक्साईज धोरणाच्या संदर्भात CBI ने शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा टाकला . आज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 13 जणांच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे . या सर्वांना आता देश सोडण्यास मनाई करण्यात आली असून , त्यांना केव्हाही अटक करण्यात येऊ शकते .

सविस्तर माहितीनुसार , दिल्लीच्या नव्या एक्साइज धोरणाच्या चौकशी प्रकरणी CBI ने शुक्रवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी छापा टाकला . केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 14 तास चौकशी केल्यानंतर त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉप देखील जप्त केला आहे. त्यासह काही महत्त्वाचे कागदपत्र देखील जप्त करण्यात आले असल्याचे समजते. त्यांच्या विरोधात रविवारी लुकाऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

मनीषा सिसोदिया यांच्या विरोधात भादवि कलम 120 B , 477 A आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान भादवि कलम 20 B आणि PC कायदा कलम 7 नुसार या प्रकरणांमध्ये ED देखील चौकशी करू शकते . त्यामुळे या सर्वांवर आता अटकेची कारवाई देखील होऊ शकते.

Share This News
error: Content is protected !!