राज्यातील सत्ता संघर्षाची होणार LIVE सुनावणी ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

423 0

येत्या 27 सप्टेंबर पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सत्ता संघर्षावर होणाऱ्या घटनापिठासमोरील खटल्याची सुनावणी आता थेट पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतलाय.

बार अँड बेंचने दिलेल्या माहितीनुसार घटनापीठांसमोरील खटल्याची सत्ता संघर्ष बाबतची सुनावणी सर्व प्रथम युट्युबवर लाईव्ह होणार आहे. त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी सर्वोच्च न्यायालय स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे. हा निर्णय सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फुल कोर्ट मीटिंगमध्ये घेण्यात आला. या आधी सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्या निवृती वेळी लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले होते.

Share This News
error: Content is protected !!