“बघूयात , बारामतीची जनता कुणाला कौल देते ?” अजित पवारांचं भाजपला आव्हान

290 0

पिंपरी चिंचवड : भाजपचं बारामतीत स्वागत आहे. बघूया बारामतीची जनता कुणाला कौल देते असं आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला केलं आहे. अजित पवार हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते. दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी दिल्या.

अधिक वाचा : VIDEO : अजित पवारांची नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट ; गणरायाचं घेतलं दर्शन…

मी राजकारण डोळ्यासमोर ठेवून कुठलेही कार्य कधी करत नाही. कोरोनामुळे मागील दोन वर्षे पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळाला भेट देता आल्या नाही. यावेळी मात्र गणेश मंडळांना भेट देतोय, राज्यात सुख, शांती नांदू दे……! अस साकडं देखील अजित पवारांनी गणपती बाप्पाकडे घातलं आहे. सोबतच अनेक राजकीय प्रश्नांवर देखील त्यांनी प्रसार माध्यमांना उत्तरं दिली पाहूया अजित पवार काय म्हणालेत.

Share This News
error: Content is protected !!