हे सरकार टिकू दे ! पिंपरीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची गणरायाचरणी प्रार्थना… पाहा

177 0

पिंपरी-चिंचवड : ‘न्यायालयाच्या निर्णयाबाबत भाष्य करणं योग्य होणार नाही पण जनतेच्या सेवेसाठी असलेलं हे सरकार टिकू दे,’ अशी गणपती चरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. पिंपरी येथील एसएनबीपी स्कूलला भेट दिल्यानंतर केसरकर बोलत होते.

दसरा मेळावा कोणाचा होणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असंही केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट हे एक होतील का यावर स्पष्ट बोलण्याचं टाळत सध्या भाजप सेनेचं सरकार आहे आणि आम्ही व्यापक हिंदुत्वसाठी काम करतोय, असंही ते म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!