#PUNE : जुन्नरमध्ये बिबट्यांचा थेट घरात घुसण्याचा प्रयत्न; थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद, पहाच

1068 0

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये आज देखील जंगली जनावरांची दहशत आहे. अर्थात बिबट्यांनी आजपर्यंत अनेकदा थेट रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. तर गावाच्या रस्त्यांवर देखील अनेकदा बिबट्यांचा थेट वावर असलेले दिसून आले आहे. सध्या एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक-दोन नाही तर तीन बिबटे एका घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत.

विवेक गुप्ता यांच्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ जुन्नर तालुक्यातील असून मध्यरात्रीच्या वेळी तीन बिबटे एका घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं यामध्ये स्पष्ट दिसून येते आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं असून, रात्री अपरात्री उसाच्या शेतात जाताना काळजी घेण्याचा आवाहन वनविभागाने केल आहे.

Share This News
error: Content is protected !!