कल्याणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या 10 तासांनंतर जेरबंद (VIDEO)

713 0

कल्याण : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर 10 तासांनंतर जेरबंद करण्यात आला आहे.रेस्क्यू टीमनं 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करताच स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्या शिरला. तो आधी हनुमान नगर परिसरातील नागरिकांना दिसला होता. त्यानंतर काटेमनिवली येथील चिंचपाडा परिसरात शिरला. गुरुकृपा सोसायटीत 20 मिनिटे फिरल्यानंतर बिबट्या श्रीराम अनुग्रह सोसायटीमध्ये शिरला.

याची माहिती तोपर्यंत कल्याण वन विभागास मिळाली. कल्याण व बदलापूर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सोसायटी परिसरातच स्थानबद्ध केलं.बिबट्याला पकडताच नागरिकांनी जल्लोष करत रेस्क्यू टीमचे आभार मानले.बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू सेंटर इथं हलवण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!