तोंडात शिकार धरून बिबट्याचा मुक्त संचार… पाहा व्हिडिओ

585 0

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मानवी वस्तीमध्ये प्रवेश करून एकट्या-दुकट्या माणसावर हल्ला करून त्यांचा जीव घेण्यापर्यंत बिबट्यांची मजल गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्याच्या वाढलेल्या घटना बघता शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. कारण त्यांची जनावरे बिबट्याची शिकार होत आहेत. पाळीव प्राण्यांबरोबरच माणसांवर देखील बिबट्याचे हल्ल्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी गावकरी एकटेदुकटे घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात बिबट्याची मोठी दहशत पाहायला मिळते. जुन्नर तालुक्यातील राजुर गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने एका कुत्र्याची शिकार करून कुत्र्याला तोंडात घेऊन ऐटीमध्ये गावभर फेरफटका मारलाय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जुन्नर मधील घटना बघता नागरिक भीतीच्या छ्येत वावरत आहेत. वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Share This News
error: Content is protected !!