“चोर सोडून संन्याशाला फाशी” पुणे मनपाचा अजब कारभार ! मिळकतकर थकबाकीदाराचा फ्लॅट सापडला नाही म्हणून तिसऱ्याचीच सदनिका केली सील

772 0

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने कर संकलन विभागाच्या मिळकत कर गोळा करण्याच्या साठी वर्षा अखेर म्हणून जोरदार मोहीम राबविण्यात येते आहे. दरम्यान पुणे मनपा मिळकतकर थकबाकीदार मेहता म्हणून आहेत. पण इमारतीमध्ये त्यांचा फ्लॅट सापडला नाही म्हणून काहीही संबंध नसताना इमारतीत राहणारे अरुण घोडके यांची सदनिका सील करण्यात आली. आज या विचित्र प्रकाराने संबंधित व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

“चोर सोडून संन्याशाला फाशी” असा अजब पुणे मनपाचा कारभार सामोरा आला आहे. संबंधित माहिती कर संकलन प्रमुख अजित देशमुख यांच्या निदर्शनास राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आणून दिली. ज्या व्यक्तीच्या सदनिकेचा विनाकारण सील करण्यात आले ते अरुण घोडके हे प्रतिष्ठित व्यापारी असून त्यांना यामुळे नाहक बदनामीला सामोरे जाऊन मनस्ताप सोसळण्याची वेळ आली आहे.

या प्रकरणी तात्काळ संबंधित अधिकरी आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा इमारतीमध्ये येऊन शहानिशा केली असता त्यांच्या सदर बाब लक्षात आली आणि त्यानंतर हे सील काढण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!