पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाशी एकरुप झालेलं नेतृत्वं, चांगला लोकप्रतिनिधी गमावला – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

292 0

नागपूर : “पुण्याच्या माजी महापौर, कसबा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. १९९२ पासून नगरसेवक असलेल्या मुक्ताताईंना पुण्याच्या प्रश्नांची चांगली जाण होती. पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक जीवनाशी एकरुप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं.

लोकमान्य टिळकांच्या घराण्याचा वारसा त्यांनी यशस्वीपणे जपला. आमदार म्हणून 2019 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. मुक्ताताईंच्या निधनानं एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान कायम लक्षात राहील,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

Share This News
error: Content is protected !!