ठळक बातम्यामनोरंजन

पोट धरून हसाल : लिंबूच मटन , धनंजय माने इथेच राहतात का ? हे डायलॉग कधीही न विसरणारे , पण यातला एक डायलॉग घेताना मामांकडून झाली होती ‘ही’ चूक तरीही ठरला सुपरहिट

अशी ही बनवाबनवी यातले डायलॉगच काय , या चित्रपटाचं नाव जरी आज कुणी घेतलं तर एक नकळत हसू चेहऱ्यावर उमटून जातं. मराठी प्रेक्षकांच्या मनावर आजही 34 वर्षानंतर अधिराज्य करणारा हा चित्रपट केव्हाही पाहिला तरीही कंटाळवाणा होत नाही.

See the source image

यातले अनेक संवाद तर असे आहेत ज्यावर आजही मीन्स व्हायरल होत असतात . त्यापैकी धनंजय माने इथेच राहतात का ? ,तुमचे 70 रुपये वारले , लिंबूचं मटण असे कित्येक डायलॉग आहेत ज्यामुळे आपण खळखळून हसलो. पण यामध्ये आणखीन एक डायलॉग असा आहे, ज्यावर आपण प्रचंड हसलो देखील आहे.

See the source image

पण तुम्हाला माहित आहे का ? की अशोक सराफ यांनी हा डायलॉग आहे तसा घेतला नव्हता. अर्थात तो बोलण्याच्या ओघात सहज तसा निघून गेला. आणि जबर सुपर हिट ठरला.

See the source image

हा डायलॉग होता “हा माझा बायको पार्वती”. आता हा सीन आठवल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं की मामांनी हा डायलॉग किती सहज घेतला. आणि त्याहीपेक्षा हा चित्रपट आज देखील पाहताना आपण किती एन्जॉय करतो. त्याही पेक्षा या कलाकारांनी हा चित्रपट बनवताना किती आनंद घेतला असेल हे देखील लक्षात येते.