राहुल गांधी यांना आणखी एक झटका ! ब्रिटनमध्ये आणखी एक मोदी दावा ठोकणार

601 0

मोदी आडनावावरून टीका केल्याचा फटका राहुल गांधी यांना बसला आणि त्यांना खासदारकी गमवावी लागली. राहुल गांधी याचे राजकीय अस्तित्व धोक्यात आलेले असतानाच त्यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ललित मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात ब्रिटनमध्ये खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ललित मोदीने ट्विट करून राहुल गांधींविरोधात ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये ललित मोदीने म्हटले आहे की ”राहुल गांधी मला फरार म्हणत आहेत, परंतू त्यांच्याकडे याचे काय पुरावे आहेत. कोणत्या आधारे मला फरार म्हणत आहेत. मला कुठे दोषी ठरविले गेले आहे का? त्यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते माहिती न ठेवता बदल्याचे राजकारण करत आहेत ”

तसेच मी या विरोधात राहुल गांधींवर युकेच्या कोर्टात खटला दाखल करणार आहे. मला खात्री आहे की ते माझ्याविरोधात सर्व ठोस पुरावे घेऊन येतील. राहुल गांधी स्वत:ला कसे मुर्ख बनवून घेतात हे मला पहायचे आहे. आर के धवन, सीताराम केसरी, मोतीलाल व्होरा, सतीश शर्मा, एनडी तिवारी रहे सर्व गांधी कुटुंबाशी संबंधीत आहेत. यांच्या परदेशात मालमत्या कशा आहेत? हे कमलनाथना विचारा, असा आरोपही ललित मोदीने केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!