पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच ! गाडी हळू चालवायला सांगितल्यानं कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; गृहविभागाने तातडीने धोरणात्मक पाऊले उचलावी – रूपाली चाकणकर

1038 0

पुणे : पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून कोयता यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे अगदी क्षुल्लक कारणांवरून कोयते हातात घेऊन दहशत वाजवण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसून येत आहेत असाच एक प्रकार पुण्यातील गोऱ्हे बुद्रुक गावात घडलाय.

काही दिवसांपूर्वी कोयता गँगवर अॅक्शन घेण्यास सुरूवात केली आहे. कॉंम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईत आत्तापर्यंत 108 पेक्षा अधिक कोयतेत जप्त देखील केले होते मात्र तरी देखील या कोयता गँगची दहशत काही कमी व्हायचं नाव घेत नसून आता पुण्यातील खडकवासला भागात असणाऱ्या गोऱ्हे बुद्रुक गावात गाडी हळू चालवा असं सांगितले. त्यानंतर काही सराईतांनी हातात कोयते व तलवार घेऊन दहशत माजवविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान याबाबत आम्ही जेव्हा प्रत्यक्ष या गावातील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी थेट कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला त्यामुळं घटना केवढी थरारक आहे याचा अंदाज येतोय

दरम्यान या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून पुण्याची गरिमा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी गृहविभागाने देखील तातडीने धोरणात्मक पाऊले उचलावी यासाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान या कोयता गँगची दहशत मोडीत काढण्यासाठी पुणे पोलीस कठोर उपाय योजना करणार का हेच पाहणं महत्त्वाचं असेल

Share This News
error: Content is protected !!