CRIME NEWS : पेट्रोल पंपावरील कर्मचारी महिलेवर भरदिवसा कोयता हल्ला… सीसीटीव्ही व्हिडिओ पाहा

615 0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या पाथर्डी गावाजवळच्या एका पेट्रोल पंपावरील अत्यंत धक्कादायक दृश्ये समोर आली आहेत. अज्ञाताकडून भर दिवसा पेट्रोल पंपावरील कर्मचारी महिलेवर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही चित्तथरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

नाशिकच्या पाथर्डी-वडनेर रोडवरील जाधव पेट्रोलियम पंपावर काम करणाऱ्या महिलेवर प्रमोद गोसावी या संशयित व्यक्तीने कोयत्याने सपासप वार केले. हा सर्व प्रकार घडताना कुणीही महिलेला वाचवण्याचा प्रयत्न न करता केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचं सीसीटीवव्हींमध्ये दिसून येतंय.या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. हा सर्व थरारक प्रकार सीसीटीवव्ही कॅमेरात कैद झाला आहे. महिलेला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. हा जीवघेणा हल्ला करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. तसच आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!