कोथरूड नाट्य परिषदेच्या वतीने ५ डिसेंबर रोजी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन

446 0

पुणे : अ.भा. मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखा व आम्ही कोथरुडकर यांच्या वतीने सोमवार दिनांक ५ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता विक्रम गोखले याना श्रद्धांजली सभेचे आयोजन अंतरनाद योग केंद्र ,करिष्मा सोसायटी जवळ , हॉटेल वाडेश्वर च्या बाजूला , कर्वेरोड येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.

श्रद्धांजली सभेत महाराष्ट्राचे तंत्र व उच्चशिक्षण मंत्री व पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री आशा काळे, विजय फळणीकर, राजस दामले, राज काझी, श्रीराम रानडे, वृषाली गोखले, अ‍ॅड.अर्चिता मंदार जोशी, निकिता मोघे ,नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर, आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.

तरी या श्रद्धांजली सभेत रसिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान सुनील महाजन, संदीप खर्डेकर , अ‍ॅड मंदार जोशी यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!