#KOLHAPUR CRIME NEWS : प्रेमात पती होता अडसर; पत्नीने केली क्रूरतेने हत्या; शीर केले धडा वेगळे, पत्नी आणि प्रियकरासह आठ जणांना जन्मठेप

886 0

कोल्हापूर : जानेवारी 2011 मध्ये कोल्हापूरात एक भीषण हत्याकांड घडले होते. पत्नीनच आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या करवली होती. आपल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण करवले. त्यानंतर पतीला मारहाण करून निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली. त्याचे धड शिरा वेगळे करण्यात आले.

या दोघांनी नितीन यांच्या हत्येची सुपारी दिली होती. या प्रकरणातील आठ आरोपींनी नितीनचे धड एका दरीत फेकून दिले. तर शीर वेगळे करणारा मुख्य आरोपी अमित यान नितीनचे शीर, शर्ट आणि मोबाईल हँडसेट वारणा नदीमध्ये फेकून दिले होते. त्यानंतर पत्नीने 14 तारखेला पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती.

दरम्यान या प्रकरणातील प्रमुख आरोपी नितीन याची पत्नी, तिचा प्रियकर आणि आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या मध्ये रवी रमेश माने, दिलीप व्यंकटेश दुधाळे, मनेश सबण्णा कुचकोरवी, विजय रघुनाथ शिंदे, किशोर दोडाप्पा माने, आकाश ऊर्फ अक्षय सीताराम वाघमारे, लीना नितीन पडवळे आणि गीतांजली विरुपाक्ष मेनशी या आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर या गुन्ह्यातील सतीश वडर आणि इंद्रजीत बनसोडे हे दोघे फरार आहेत.

Share This News
error: Content is protected !!