CRIME NEWS : जेवणात मीठ जास्त पडलं म्हणून ठार मारलं! आचाऱ्याच्या खूनप्रकरणी ढाबाचालक भावंडांना अटक

322 0

पिंपरी-चिंचवड : जेवणात मीठ जास्त पडल्याच्या किरकोळ कारणावरून ढाबा चालकानं आपल्या आचाऱ्याचा खून केला. पिंपरी-चिंचवड मधील चाकण पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या शेल पिंपळगाव येथे ही घटना घडली.

प्रसेनजीत गोराई, असं खून झालेल्या आचाऱ्याचं नाव असून तो मूळचा पश्चिम बंगालचा राहणारा होता. प्रसेनजीत गोराई हा शेल पिंपळगाव येथील ओंकार ढाबा या ठिकाणी आचारी म्हणून कामास होता. 26 ऑक्टोबर रोजी ढाब्यावर स्वयंपाक करत असताना त्याच्याकडून चुकून जेवणात मीठ जास्त पडलं. याच कारणावरून ढाबाचालक ओंकार अण्णाराव केंद्रे आणि कैलास अण्णाराव केंद्रे यांनी त्याला लोखंडी पाईप, लोखंडी रॉड आणि वायरच्या साह्यानं बेदम मारहाण करून त्याचा खून केला.

इतकंच नव्हे तर खून केल्यानंतर दोन ते दिवस केंद्रे बंधूंनी त्याचा मृतदेह स्वतःच्या ढाब्यातच लपवून ठेवला. त्यानंतर त्याचा मृतदेह ढाब्यापासून काही अंतरावर असलेल्या एका खड्ड्यात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी प्रसेनजीत गोराई यांच्या खुनाचा छडा लावला. ढाबाचालक ओंकार केंद्रे आणि कैलास केंद्रे या दोन्ही भावंडांना शस्त्र विरोधी पथकानं खुनाच्या गुन्ह्यात अटक केलीये.

Share This News
error: Content is protected !!