धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील यवत येथून १० वर्षीय मुलीचे अपहरण

7735 0

पुणे जिल्ह्यातील यवत गावातून एका १० वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. घराबाहेर खेळायला जाते असे सांगून ही मुलगी गेली होती. तिचा शोध घेऊन देखील न सापडल्यामुळे यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कु. सलोनी तीलकसिंग टाक (वय-१०, रा. यवत, ता. दौंड) असं अपहरण करण्यात आलेल्या मुलीचं नाव असून याप्रकरणी मुलीची आई सुनीता कौर तीलकसिंग टाक (वय-३०, रा. पॉवरहाऊस, यवत ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळायला जाते असे सांगून सलोनी घराच्या बाहेर पडली होती. परंतु ती परत न आल्याने कुटुंबीयांनी आजुबाजूला व चौफुला, केडगाव, भांडगाव, खोर येथील नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र सलोनी कोठेही सापडली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फुस लावून तिला पळून नेल्याची तक्रार तिच्या आईने दिली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी भेट दिली

मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे-

रंग- गोरा, चेहरा- गोल, केस- काळे , उंची -अंदाजे ४ फुट, अंगात निळ्या रंगाचा कुर्ता व निळ्या रंगाची पॅन्ट असून ती मराठी व हिंदी भाषा बोलते.

Share This News
error: Content is protected !!