#Latest Updates : कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात वाचा , अत्यंत चुरशीची लढत , आतापर्यंत काय झाले ?

543 0

पुणे : आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठीची प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली आहे. दरम्यान उमेदवारांची धाकधूक सातत्याने वाढते आहे. दोन्हीही प्रमुख पक्षांचे उमेदवार आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना 11 हजार 157 मत मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना 10 हजार 673 मतं मिळाली आहेत. अत्यंत चुरशीची ही लढत होताना दिसून येते आहे. त्याचबरोबर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांना 12 मतं मिळाली असून, अभिजीत बिचुकले यांना 4 मतं मिळाली आहेत.

मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. एकीकडे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दोन्हीही प्रमुख पक्षांचे उमेदवार आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत.

यावेळी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना म्हटले की, मी वीस ते तीस हजार मतांनी निवडून येणार आहे. असा मला विश्वास आहे. माझ्या कामाची पावती मला नक्की मिळेल. कोण काय आरोप करत आहे त्याला मी महत्त्व देत नाही. मी लोकांसाठी काम करतो. लोक मला नक्की निवडून देतील असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केलाय.

दुसऱ्या फेरीतील मते

धंगेकर 2,751

रासने 4,095


चौथी फेरी :-

हेमंत रासने :- 3,111

रवींद्र धांगेकर :- ४,३८९


पाचवी फेरी :-

हेमंत रासने :- 2,641

रवींद्र धांगेकर :- 4,131

——————————————————————————————————————

दहावी फेरी

धंगेकर 38286

रासने 34022

Share This News
error: Content is protected !!