कसबा विधानसभा पोटनिवडणूक 2023 : संभाजी ब्रिगेडच्या वतीने उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी ? वाचा हि बातमी

593 0

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक 2023 संभाजी ब्रिगेडच्या वतीने अधिकृत उमेदवार शिवश्री अविनाश मोहिते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र सचिव सौरभ दादा खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवक्ते गंगाधर बनबरे सर, संभाजी ब्रिगेडचे संघटक संतोष शिंदे, त्याचप्रमाणे सहसंघटक मनोज गायकवाड, व हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ही निवडणूक लढणार आणि जिंकणारच असा ठाम विश्वास या ठिकाणी प्रदेश महासचिव स्वरूप दादा खेडेकर यांनी बोलताना व्यक्त केला.

Share This News
error: Content is protected !!