कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद : दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अमित शहा यांनी दिला ‘हा’ निर्वाळा

441 0

नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित होते.

या बैठकीनंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर तात्पुरता काय तोडगा काढण्यात आला आहे याविषयी माहिती दिली. यावेळी अमित शहा म्हणाले की, “जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत दोन्हीही बाजूने कोणताही दावा केला जाणार नाही. सीमेवरून जो वाद निर्माण झाला होता तो संपवण्यासाठी मी दोन्हीही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि इतर महत्त्वाच्या अधिकारी आणि नेत्यांसमोर सकारात्मक चर्चा झाली आहे.

चांगल्या वातावरणात चर्चा झाली. दोन्हीही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक मुद्दे ठेवले असून सीमा प्रश्नावर भांडण करून नाही रस्त्यावर उतरून नाही तर संविधानाच्या कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटू शकतो असे या बैठकीत निश्चित झालं असल्याचं अमित शहा यांनी सांगितल आहे.

Share This News
error: Content is protected !!