कर्नाटक मुख्यमंत्र्यांची पुन्हा आडमुठी भूमिका; महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील गावांसाठी दिलेला निधी कर्नाटक सरकार रोखणार? काय म्हणाले बोम्मई, वाचा

531 0

कर्नाटक : राज्य अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील एकूण 865 गावांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून 54 कोटी निधी जाहीर केला. मात्र कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हा निधी रोखणार असल्याचं त्यांनी जाहीर केल आहे.

दरम्यान कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात येत असून विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. यावेळी बोम्मई म्हणाले की, जर महाराष्ट्र सरकार इथे निधी देत आहे. तर मी का राजीनामा द्यावा ? आपणही महाराष्ट्रातील पंढरपूर, तुळजापूर सारख्या ठिकाणांसाठी निधी दिला आहे. कारण या ठिकाणी कर्नाटकचे लोक जात असतात. या प्रकरणात मी लक्ष घालेन. काय करायला हवं हे मला शिवकुमार यांच्याकडून शिकण्याची गरज नाही. हा निधी थांबवण्यासाठी आम्ही पावलं उचलू असे देखील बोम्मई यांनी यावेळी म्हटलं आहे.

एकंदरीत परिस्थिती पाहता सीमावाद हा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह दिसून येत आहेत. महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी बहुल गावांसाठी जारी केलेल्या निधीवर कर्नाटक सरकारने घेतलेल्या या भूमिकेवर महाराष्ट्र सरकार काय प्रतिक्रिया देते हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!