जिओकडून “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर

536 0

एका रिचार्जवर पूर्ण महिन्याची वैधता

“कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर करणारी जिओ पहिली टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ठरली आहे. या योजनेमध्ये दर महिन्याला त्याच तारखेला योजनेचे नूतनीकरण केले जाते. ₹ 259 च्या मासिक योजनेचे प्रत्येक महिन्याच्या निश्चित तारखेला नूतनीकरण करावे लागेल. 1.5 GB प्रति दिन डेटा आणि इतर फायद्यांसह अमर्यादित कॉलिंग सुविधा आता ग्राहकांसाठी उपलब्ध असतील

भारतातील सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर, जिओने ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी’ प्रीपेड योजना ही आणखी एक ग्राहक-केंद्रित नवीन योजना सादर करण्याची घोषणा केली आहे
₹259 ची योजना अद्वितीय आहे कारण ती वापरकर्त्यांना 1 कॅलेंडर महिन्याच्या कालावधीसाठी अमर्यादित डेटा आणि कॉलिंग यांसारख्या फायद्यांचा आनंद घेऊ देते. ज्या तारखेला रिचार्ज केले जाईल त्याच तारखेला हा प्लॅन दर महिन्याला रिन्यू करावा लागेल.
हा नवोपक्रम प्रीपेड वापरकर्त्यांना दर महिन्याला फक्त एक रिचार्ज तारीख लक्षात ठेवण्यास मदत करतो.

योजनेबद्दल:
• उदाहरणार्थ वापरकर्त्याने ५ मार्च रोजी नवीन ₹259 मासिक प्लॅनसह रिचार्ज केल्यास, पुढील रिचार्ज तारखा 5 एप्रिल, 5 मे, 5 जून इ.
• जिओच्या इतर प्रीपेड प्लॅनप्रमाणे, ₹ 259 चा प्लान एकाच वेळी अनेक वेळा रिचार्ज केला जाऊ शकतो. अॅडव्हान्स रिचार्ज प्लॅन रांगेत जातो आणि सध्याच्या सक्रिय योजनेच्या एक्सपायरी तारखेला आपोआप सक्रिय होतो.
योजना सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलद्वारे नवीन आणि विद्यमान वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

योजनेचे फायदे:
• डेटा – 1.5Gb/दिवस (त्यानंतर @ 64Kbps)
• अमर्यादित व्हॉइस कॉल
• 100 SMS/दिवस
• जिओ अॅप्सची मोफत सदस्यता
• वैधता – 1 महिना (दर महिन्याला त्याच तारखेला नूतनीकरण)

Share This News

Related Post

माझ्यावर आरोप करणारी महिला दाऊद गँगशी संबंधित; शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा धक्कादायक आरोप

Posted by - December 25, 2022 0
माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल…

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना नारळ; खासदार गजानन कीर्तिकर यांची नव्याने नियुक्ती, वाचा सविस्तर

Posted by - March 23, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर सर्व महत्त्वाच्या पदावरून…

महाराष्ट्रात मुंबईसह या जिल्ह्यांना ४८ तासांत मुसळधार पावसाचा फटका बसण्याचा इशारा

Posted by - April 7, 2023 0
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला अतिमुसळधार पावसाचा…

महत्वाची बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Posted by - January 17, 2023 0
पुणे : महानगरपालिका निवडणुकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून त्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष…

किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी (व्हिडिओ)

Posted by - February 5, 2022 0
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केल्यानंतर सोमय्या राऊतांविरोधात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी शिवाजी नगर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *