ऐकावे तेवढे नवलचं ! मॉलच्या चेंजिंग रूममध्ये महिला कपडे बदलताना २ वर्षाच्या बाळाने सोशल मीडियावर सुरु केले लाईव्ह , आणि मग महिलेने …

1066 0

चीन : चीन मधील एका मॉल मध्ये महिला कपडे बदलत असताना एका २ वर्षाच्या बाळाने सोशल मीडियावर लाईव्ह सुरु केले. हि गोष्ट महिलेच्या लक्षात आल्या नंतर तिने त्या बाळाला आणि त्याच्या आईला शिवीगाळ केली.

मिळालेल्या माहिती नुसार , चीन मधील एका बड्या शहरात युनिक्लो स्टोअरच्या चेंजिंग रुममध्ये एक महिला कपडे बदलत असताना तिथे एक दोन वर्षांचा मुलगा देखील उभा होता. महिलेला पाहताच त्याने आपल्या मोबाइलचा कॅमेरा महिलेकडे वळवला. या मुलाने चेंजिंग रूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईव्ह केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

हि गोष्ट लक्षात आल्यानंतर या महिलेने त्या मुलाला आणि त्याचा आईला शिवीगाळ केली आहे. तसेच त्या मुलाच्या हातून मोबाईल देखील हिसकावून घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!