‘ही 101 टक्के आत्महत्या नसून हत्या !’ सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नवा खुलासा VIDEO

1007 0

बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू होऊन अडीच वर्षे लोटली मात्र सुशांतसिंहची आत्महत्या की हत्या या प्रकरणावरून अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. दरम्यान, या प्रकरणी नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडालीये. सुशांतसिंह राजपूत यानं आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा करणारी एक व्यक्ती पुढं आता पुढं आलीये. कोण आहे ही व्यक्ती ? आणि तिनं नेमका काय दावा केलाय ?

बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू झाल्यानंतर कपूर रुग्णालयातील शवागृहात त्याच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम करण्यात आलं. त्यावेळी उपस्थित असलेल्या एका निवृत्त कर्मचाऱ्यानं हा दावा केलाय. या निवृत्त कर्मचाऱ्याचं नाव आहे रुपकुमार शाह. रुपकुमार शाह हे दीड महिन्यापूर्वी निवृत्त झाले आहेत. नोकरीत असताना त्रास होऊ नये म्हणून आपण इतक्या दिवस गप्प होतो, असं शाह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, सुशांतची आत्महत्या नसून हत्या झालीये. सुशांतचा मृतदेह रूग्णालयात आणण्यात आला तेव्हा त्याच्या अंगावर जखमा होत्या. त्याच्या मृतदेहावर मुका मार लागल्याच्या खुणा होत्या. पोस्टमार्टेम करतेवेळी मी तिथंच होतो.
सुशांतच्या हा मृतदेह आत्महत्येचा नसून हत्येचा असल्याचं मी वरिष्ठांना सांगितलं परंतु माझं काम मी करतो, तुझं काम तू कर,’ असं मला सांगण्यात आल्याचं रुपकुमार शाह यांनी म्हटलंय.

माझं काम केवळ पोस्टमार्टेम करणं आणि मृतदेह शिवणं हेच होतं. दीड-दोन तास पोस्टमार्टेम चाललं मात्र त्याची व्हिडिओग्राफी केली नाही फक्त फोटोग्राफी केली गेली, असंही त्यांनी म्हटलंय. मी 28 वर्षात 50 ते 60 मृतदेहाचं पोस्टमार्टेम केलं आहे. सुशांतचा मृतदेह पाहिल्यावर ही हत्या असल्याचं दिसलं. हातापायाला मार लागलेला माणूस गळफास लावून घेऊ शकत नाही. सुशांतनं आत्महत्या केली असावी हे मला पटलं नाही. मी याबाबत वरिष्ठांना कळवलं तेव्हा केवळ पोस्टमोर्टम करून द्या, असं सांगण्यात आलं. पोस्टमार्टेम 2 महिला आणि 3 पुरुष डॉक्टर होते. आमच्यात संभाषण झालं होतं. ही हत्या असल्याची चर्चा झाली. तेव्हा तुम्ही तुमचं पोस्टमार्टेमचं काम करा आम्ही अहवाल बनवतो, असं डॉक्टरांनी म्हटल्याचा खुलासाही शाह यांनी बोलताना केला. अखेर आम्ही मृतदेहाचं पोस्टमार्टेम केलं आणि जे काही नमुने होते ते पोलिसांकडं सुपूर्द केले, असंही रुपकुमार शाह म्हणाले.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नवा खुलासा करणाऱ्या कूपर हॉस्पिटलच्या या निवृत्त कर्मचाऱ्यानं पुढं जे काही म्हटलंय ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. शाह यांच्या दाव्यानुसार…

101 टक्के ही आत्महत्या नसून हत्याच होती. आज माझं वय 60 वर्षे आहे. माझं कुटुंब आहे. माझाही मृतदेह तिथेच आला तर काय ? मी आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे. आता मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत त्यामुळे मी पुढे येऊन बोलतोय. मी नाव घेऊन सांगू शकत नाही पण कुठलीही वाच्यता बाहेर करू नका, असं मला सांगण्यात आलं होतं. सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी मी पुढे आलोय.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात हा नवा आणि खळबळजनक खुलासा समोर आल्यानं या प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलं आहे. याबाबत खुलासा करणारी ही व्यक्ती अडीच वर्षानंतर का माध्यमांसमोर आली आणि कुठलीही वाच्यता करू नको, असं तिला कुणी सांगितलं असावं, या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर सुशांतसिंह राजपूत यानं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली यावर प्रकाश पडू शकेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!