आला थंडीचा महिना… पण जाणवतोय उकाडा ? ‘या’ कारणाने झाली आहे तापमानात वाढ…

271 0

महाराष्ट्र : उन्हाळ्यात-पावसाळा, पावसाळ्यात-हिवाळा आणि हिवाळ्यात-उन्हाळा असं काहीसं वातावरण पाहायची आता सवय झाली आहे. गेली दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये तापमान वाढीचा अनेकांना अनुभव येतो आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा आणणारे ठरत असल्या कारणामुळे आईला थंडीमध्ये तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून पुढचे काही दिवस तरी आराम मिळेल.

हवामान खात्याने दिलेल्या तापमान नोंदीनुसार गोंदियामध्ये ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. तर महाराष्ट्रामध्ये सोलापूरचे तापमान हे 33.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

पुण्यात ढगाळ वातावरण असल्याकारणामुळे वातावरणात थंडावा आहे. परंतु रात्रीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचे जाणवते आहे. पूर्वेकडील बंगालच्या उपसागरातून दक्षिण द्वीपकल्पीय भागातून बाष्पयुक्त वारी येत असल्यामुळे तापमानात वाढ नोंदवली जाते आहे.

Share This News
error: Content is protected !!