Senior Advocate Ujwal Nikam : ” राज्यघटनेच्या संदर्भात कोणाच कृत्य घटनाबाह्य होत यावर भाष्य अपेक्षित होतं, पण …!”

278 0

सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सत्तेचा सारीपाठ रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने वकिलांनी जबरदस्त युक्तिवाद करून एकमेकांच्या मुद्द्यांना चुकीचा ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दरम्यान न्यायालयातील आजच्या युक्तिवाद आणि एकंदरीत घटनेवर जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले कि , ” राज्यघटनेच्या संदर्भात कोणाचं कृत्य घटनाबाह्य होतं यावर भाष्य अपेक्षित होत तसं काही घडलं नाही . परंतु बहुमत किंवा लोकशाहीमध्ये अंतर्गत बहुमत व्यक्त करणे अशा प्रकारचा वित्ती आज सर्वोच्च न्यायालयात झाल.  खरं म्हणजे 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली तेथून या सर्वांना सुरुवात झाली आणि त्यावर त्यांनी खुलासा केला . तो खुलासा मान्य किंवा अमान्य झाला त्यावर सक्षम अधिकाऱ्यांनी निर्णय देणे अपेक्षित होते.

तोही प्रलंबित राहिला ,अशा परिस्थितीमध्ये निवडून आलेल्या विधिमंडळाच्या सभासदांनी पक्षांतर्गत बंदी कायद्याच्या परिशिष्ट 10 अन्वये ते अपात्र ठरतात का ? त्यांचं कोणतं कृत्य असं आहे की ज्यामुळे ते पक्षांतर्गत बंदी कायदा खाली अपात्र ठरतात ,याचा खुलासा आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेणे हे कायद्यास अपेक्षित असतं. हा सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला तो प्रामुख्याने फ्लॉवरील लैंग्वेजमध्ये झाला.

राज्यघटनेच्या संदर्भात कोणाचा कृत्य घटनाबाह्य होत, यावर भाष्य अपेक्षित होतं , तसं काही घडलं नाही. परंतु बहुमत व्यक्त करणं अंतर्गत बहुमत व्यक्त करणे अशा प्रकारचा युक्तिवाद आज सर्वोच्च न्यायालयात झाला . असे प्रतिक्रिया उज्वल निकम यांनी दिली महाराष्ट्रात राज्यपालांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवलं ज्या वेळेला दृष्टिक्षेपात ही बाबा आणण्यात आली की सरकार अल्पमतात आलं आहे. राज्यपालांच्या दृष्टिक्षेपात हे आल्यानंतर त्यावर मूग गिळून गप्प बसणं हे योग्य होतं का ? असा सवाल देखील उज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे.

Share This News
error: Content is protected !!