महिला ST कंडक्टरचे गणवेशातील रिल्समुळे निलंबन योग्य की अयोग्य ?

561 0

आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक यांच्या माध्यमातून अनेक कलाकार रिल्स बनवून त्या पोस्ट करत असतात. त्यापैकी अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात देखील येतात. अशीच एक महिला एसटी कंडक्टर देखील आपल्या इंस्टाग्राम वरून प्रचंड फेमस झाली आहे. एसटी कंडक्टर म्हणून नोकरी करणारी ही सोशल मीडिया स्टार आहे मंगल गिरी…

मंगल यांनी आज पर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रिल्स बनवल्या आहेत. खरंतर असे अनेक सरकारी कर्मचारी आहेत की जे आपल्या नोकरीसह आपली कला रील्सच्या माध्यमातून जगासमोर आणतात. एक बाजू अशी ही यामध्ये म्हणता येते की ,आपल्यातली कला जगासमोर आणण्यामध्ये वाईट काय आहे ? तर मंगल यांच्याबाबत एसटी प्रशासनानं निलंबनाचा कारवाईचा बडगा उभारला आहे त्यास कारण आहे की , त्यांनी यापैकी काही रिल्स त्यांनी युनिफॉर्म घालून शूट केल्या आहेत. तर एका रीलमध्ये त्या एसटीच्या ड्रायव्हर सीटवर बसलेल्या आहेत.

ही रील शूट करताना जर का एसटी सुरू झाली असती तर अनुचित प्रकार घडू शकला असता म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचं विभागीय नियंत्रक चेतना केरवडकर यांनी म्हटल आहे. यावरून आता सोशल मीडिया युजर्ससह राजकीय वर्तुळातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.

काहींचं म्हणणं आहे की, कामकाजाच्या वेळेमध्ये अशा रील बनवणे चुकीचे आहे. तर काही जणांनी मंगल यांची बाजू घेऊन ही व्यक्ती स्वातंत्र्यावर आणली जाणारी गदा असल्याचे म्हटले जाते आहे. या मध्ये आता राजकीय वर्तुळातून देखील आक्षेप नोंदवले जात आहेत. पाहूयात रोहित पवार यांनी काय म्हटले,

दरम्यान भाजपने त्या चित्रा वाघ यांनी देखील मंगल यांची बाजू घेतली आहे.

Share This News
error: Content is protected !!