IRCTC

IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी

1466 0

भारतीय रेल्वेचे तिकिट बुकिंग IRCTC ची साइट ठप्प झाल्याचे समोर आले आहे. IRCTCच्या बेवसाइटची सेवा अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळं तिकिट बुक करण्यात समस्या येत आहे. IRCTC कडून ट्विट करून याची माहिती देण्यात आली आहे. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरच तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल. त्यानंतर सेवा पुन्हा एकदा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे, असे कंपनीकडून ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.

आयआरसीटी वेबसाइट सतत ठप्प होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ही वेबसाईट पुन्हा कधी पुर्ववत होईल हे मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही. लोकांनी IRCTC च्या ट्विटवर संताप व्यक्त केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Share This News
error: Content is protected !!