‘कौन बनेगा करोडपति’ या कार्यक्रमाने (KBC 15) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच घर केले आहे. सध्या या कार्यक्रमाचा 15 वा सिझन सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या लेटेस्ट एपिसोडमध्ये एका 7 वर्षांच्या मुलाने जे काही केले ते भल्याभल्यानादेखील जमणे अवघड आहे. रोल ओव्हर कंटेस्टंट विराट अय्यरने या कार्यक्रमात 1 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली होती. मात्र 1 कोटीच्या प्रश्नाचे उत्तर चुकले आणि 3. 20 लाख रुपयांवर समाधान मानावे लागले.
विराटनं ज्या प्रकारे प्रश्नाची उत्तर दिली हे पाहून अभिनेते आणि या कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन हेदेखील आश्चर्यचकीत झाले होते. विराटने अत्यंत डोक्याने एक – एक प्रश्नाचे उत्तर देत 1 कोटीपर्यंत मजल मारली. यामध्ये आश्चर्यकारक बाब म्हणजे विराट हा फक्त ७ वर्षांचा आहे. जर त्याने 1 कोटी रुपये जिंकले असते तर त्याच्या नावावर एक मोठा विक्रम झाला असता.
विराटला 1 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न
आवर्त सारणीमध्ये परमाणुंची संख्या ही 96 आणि 109 असणाऱ्या तत्वांच्या नावात काय युनिक आहे?
A). नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावावर आहे.
B) महिला वैद्यानिकांच्या नावावर
C) भारतीय वैद्यानिंकाच्या नावावर
D) त्यांचं काही नाव नाही.
यावेळी विराट हा वेगवेगळ्या शोधांविषयी सांगतो आणि ऑप्शनविषयी विचार करतो. त्यावेळी अमिताभ त्याला म्हणाले की जर तुला योग्य उत्तर माहित नसेल तर तू इथेच गेम सोड. मात्र, विराटनं चुकिचा निर्णय घेतला.आणि त्याने ऑप्शन A निवडला. मात्र दुर्दैवाने त्याचे हे उत्तर चुकीचे निघाले आणि त्याला 3. 20 लाख रुपयांवर समाधान मानावे लागले. ऑप्शन B हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shah Rukh Khan : शाहरूखच्या ‘डंकी’चं पहिलं धमाकेदार गाणं रिलीज
Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल
Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव
ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी