Arun Sinha Pass Away

Arun Sinha Pass Away : पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन

2220 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे व स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे (Arun Sinha Pass Away) बुधवारी निधन झाले आहे. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अरुण कुमार सिन्हा हे 1987 बॅचचे आयपीसी अधिकारी होते. सिन्हा यांना निवृत्तीच्या एक दिवस आधीच एक वर्षांसाठी सेवावाढ मिळाली होती.

अरुण कुमार सिन्हा हे 2016पासून एसपीजी चीफ म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षीच त्यांना संचालक म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे आहे. अरुण कुमार सिन्हा, 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी, केरळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष सेवा आणि वाहतूक) होते.अरुण सिन्हा, ज्यांना सुरक्षा प्रोटोकॉल आणि कायद्याच्या गुंतागुंतीची सखोल माहिती होती. त्यांनी देशभरातील विविध पोलिस दलांमधून निवडलेल्या सुमारे 3,000 च्या क्रॅक कमांडो टीमचे नेतृत्व केले होते. अरुण सिन्हा यांच्या पाश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

अनेक पदांनी गौरवण्यात आले
सिन्हा यांनी राज्यात क्राइम स्टॉपर यंत्रणेचा पाया रचला होता. त्यांच्या या प्रशंसनीय कार्यासाठी त्यांना अनेक पदके आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Share This News
error: Content is protected !!