BIG BREAKING : अविघ्न’मध्ये विघ्न ! मुंबईतील ‘वन अविघ्न’ इमारतीच्या 35 व्या मजल्यावर आग; अनेक नागरिक अडकल्याची भीती

263 0

मुंबई : मुंबईच्या लालबाग मधील वन अविघ्न या इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 35 व्या मजल्यावर भीषण आग लागली असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या इमारतीमध्ये अनेक रहिवासी देखील अडकल्याची माहिती समजते आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

Share This News
error: Content is protected !!