CRIME NEWS : पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट ; गुन्हा दाखल – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

492 0

पुणे जिल्ह्यात फिरत्या मोटारींतून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात खटला सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेत दिली.

डॉ. सावंत म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यातील मौजे सराटी या गावाच्या हद्दीत काही लोक बेकायदेशीरपणे गर्भलिंग परिक्षण करीत असल्याची माहिती 13 मे रोजी उपजिल्हा वैद्यकीय अधिक्षकांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी भेट दिली असता गर्भलिंग परिक्षण करीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात लॅब टेक्निशियन, डॉक्टर आणि वाहन चालकावर गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्रे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.’’

Share This News
error: Content is protected !!