ganapati visarjan

श्री गणेश मूर्तीची दहा दिवस स्थापना आणि त्यानंतर पाण्यामध्ये विसर्जन…! काय सांगते पौराणिक कथा

572 0

दरवर्षी आपण श्री गणेशाची मूर्ती घरामध्ये आणि मोठमोठे मंडळे देखील मंडप बांधून श्री गणेशाच्या सुंदर मोठ्या मूर्ती स्थापन करतात. श्री गणेशाचे आगमन म्हणजे घराघरात एक चैतन्याचे वातावरण पसरते प्रत्येकाच्या मनामध्ये एक सकारात्मक विचार संचारतो. पण मग दहा दिवसानंतर याच लाडक्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन का करावे याचे महत्त्व तुम्हाला माहित आहे का ? त्याचबरोबर दहा दिवस गणेशाच्या मूर्तीची स्थापना नक्की का केली जाते ? या विषयीची पौराणिक कथा देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे.

See the source image

“पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यासांनी महाभारत कथा लिहिण्यासाठी श्री गणेशाला सांगितले . स्वतः वेदव्यास यांनी महाभारताची कथा गणपतीला ऐकवण्यास सुरुवात केली. तो दिवस होता गणेश चतुर्थी…

See the source image

त्या दिवसानंतर वेद व्यासांनी महाभारताची प्रत्येक कथा गणपतीस सांगण्यास सुरुवात केली. असे म्हटले जाते की वेद व्यासांनी ही कथा सांगताना आपले डोळे बंद केले होते. परंतु महाभारतातील प्रत्येक कथा ऐकताना श्री गणेशावर काय परिणाम होतो आहे. हे त्यांच्या लक्षात आले नाही.

See the source image

त्यानंतर सलग दहा दिवस वेदव्यास महाभारताची कथा ऐकवत होते. आणि श्री गणेश ही कथा लिहित होते. महाभारत लिहून झाल्यानंतर जेव्हा व्यासांनी डोळे उघडले तेव्हा श्री गणेशाच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढले होते. याच कारणामुळे महर्षी वेदव्यासांनी श्री गणेशाला जलकुंडामध्ये डुबकी लावायला सांगितली. पाण्यामध्ये डुबकी मारल्यानंतर श्री गणेशाचे वाढलेले तापमान काहीसे कमी झाले. असे मानले जाते की श्री गणेश अनंत चतुर्दशी पर्यंत सगुण साकार रूपात या मूर्तीमध्ये स्थापित राहतात. त्यामुळेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेश मूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते.

(तुम्हाला हि माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा)

Share This News
error: Content is protected !!