भारती विद्यापीठात इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट उत्साहात… पाहा

307 0

पुणे : भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट (IMED) द्वारे आयोजित इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट 2022 नुकतीच पार पडली.

या समिटमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य आणि उत्साह दिसून आला. दरवर्षी IMED कडून इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिटचं आयोजन केलं जातं. या समिटसाठी दरवर्षी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांना निमंत्रित करण्यात येत असतं. यावर्षी प्रसिद्ध उद्योजक डॉ. अनिर्बन सरकार, IDBI Intech Ltd चे MD आणि CEO सुरोजित रॉय, AIMA चे अध्यक्ष अविनाश दलाल यांना निमंत्रित करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी स्वतःचं ध्येय निश्चित करून त्या दिशेनं वाटचाल करावी, विविध कौशल्ये आत्मसात करावीत, असं प्रेरणादायी मार्गदर्शन या निमंत्रितांकडून करण्यात आलं.

इतर देशांच्या तुलनेत भारतात अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्ही स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, असा प्रेरणादायी सल्ला डॉ. अनिर्बन सरकार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

तुमच्यात कौशल्य असेल तर तुम्ही काहीही करू शकता, असं मत सुरोजित रॉय यांनी व्यक्त केलं.

नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे बना, असा सल्ला अविनाश दलाल यांनी विद्यार्थ्यांना दिला.

IMED विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांद्वारे स्वतःला तयार करण्याची संधी देत असल्याचं प्रतिपादन IMED चे संचालक डॉ. वेर्णेकर यांनी केलं.

Share This News
error: Content is protected !!