#Germany : जर्मनीत चर्चमध्ये अंधाधुंद गोळीबार; 7 ठार 24 जखमी

550 0

जर्मनी : जर्मनीच्या हॅमबर्ग या शहरांमध्ये एका चर्चमध्ये अंधाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीमधील ग्रॉस बोर स्टेल या जिल्ह्यातील रस्त्यावरील या चर्चमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले असून आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

जर्मनी पोलीस सतर्क झाले असून या परिसरात राहणाऱ्या लोकांनी घरातच राहावे बाहेर पडू नये असं आवाहन नागरिकांना केल आहे. तसेच अनेक रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान हा हल्ला नक्की कोणी आणि का केला हे समजू शकले नाही.

Share This News
error: Content is protected !!