#PUNE : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता

1766 0

पुणे : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. क्रिकेटपटू केदार जाधव यांनी ही तक्रार दाखल केली आहे. केदार जाधव यांचे वडील महादेव जाधव वय वर्ष 75 हे राहत्या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले आहेत. असं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

नाव महादेव सोपान जाधव वय वर्ष 75

रंग गोरा, सडपातळ बांधा, उंची पाच फूट सहा इंच , पांढरे केस ,गालावर शस्त्रक्रिया केली असल्याने खड्डा पडलेला आहे. अंगावर पांढरा शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट, पायात काळे चप्पल आणि सॉक्स, अस्पष्ट मराठी भाषा बोलता येते. डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा अशी माहिती देण्यात आली आहे.

अलंकार पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सपकाळे हे करत आहेत

Share This News
error: Content is protected !!