रोडरोमिओ मुलींना पाठवायचा अश्लील मेसेज आणि व्हिडिओ; नंबर ब्लॉक करूनही पुन्हा करायचा असे कृत्य… ! मुलींनं शिकवला चांगलाच धडा

1310 0

मुंबई : आजकालचे रोडरोमिओ मुलींना त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. रस्त्यावरून जात असताना टिंगलटवाळी करणे, याहून आता वर मजल पोहोचली आहे. मुलींचे वेगवेगळ्या अँप वरून नंबर शोधून त्यांना हा रोड रोमिओ अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवत होता. या मुलींनी जर नंबर ब्लॉक केला तर दुसरा नंबर घेऊन त्या मुलींना हा रोड रोमिओ सातत्याने अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवणे सुरूच ठेवायचा.

याप्रकरणी एका मुलीने हिंमत केली आणि हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी हर्ष गिन्द्रा वय वर्ष 22 याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या मोबाईल मधून आणखीन दोन मुलींना अशाच प्रकारे तो अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवत असल्याच निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!