अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ; छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपसह विविध संघटना आक्रमक

581 0

बारामती : “संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्य रक्षक होते.” असं विधान अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केलं होतं. यावरूनच आता भाजपसह विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

दरम्यान बारामती मधील अजित पवारांच्या सहयोग निवासासमोर भाजपकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच पवार यांचा प्रतीकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला. यावेळी ‘अजित पवार हाय हाय’.. ‘धरनवीर अजित पवार’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

बारामती सह धुळ्यामध्ये देखील अजित पवार यांच्या या विधाना विषयी आक्रमक पवित्रा भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. यावेळी भाजपच्या वतीने अजित पवार यांचा प्रत्येकात्मक पुतळा पांझरा नदीपात्रात कडेलोट करत आंदोलन करण्यात आल्या.

नाशिक मधून देखील आंदोलनाचे वृत्त समोर येते आहे नाशिक मध्ये ही भाजपने आक्रमक भूमिका घेऊन नाशिक मधील रविवार कारंजा परिसरात आंदोलन केले. यावेळी पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन देखील करण्यात आल आहे.

Share This News
error: Content is protected !!