या नवरात्र उत्सवामध्ये महालक्ष्मीची अशी करा आराधना ; अवश्य मिळेल सुख-समृद्धी

498 0

महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या नवरात्र उत्सवामध्ये हे काही उपाय अवश्य करा. घरामधील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. त्यासह घरातील लक्ष्मी स्थिर होऊन आवक देखील वाढेल. अनाठही होणारा खर्च संपुष्टात येईल त्यासाठी श्री सूक्तचे असे पठण करा. 

  • श्री सूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून 5 वेळेस पठण करा.
  • कमळकाकडीच्या जपमाळेवर 11 वेळेस श्रीसूक्त पठण करतांना कुंकुवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा. यामुळे घरात अवश्य बरकत होईल.
  • श्री सुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळू हळू कमी होण्यास सुरुवात होते .
  • माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितलं आहे. या दिवशी संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30 या काळात शुचिर्भूत होऊन श्रीसूक्त पठण केल्याने धन संबंधित सर्व समस्या दूर होतात.
  • आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसूक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो.
  • आपल्याकडे कुलधर्म – कुलाचार असतो त्या दिवशी 11 वेळेस श्री सूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे.
  • नवरात्रात श्री सूक्त रोज 11 वेळेस या पद्धतीने नऊ दिवसांपर्यंत पठण केल्यास धन-धान्य , सुख-समृद्धी ऐश्वर्य मिळेल.
  • श्रीसूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते.
  • श्रीसूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात.
  • ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे ,सर्वकाही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाही , लक्ष्मी स्थिर राहत नाही अश्या व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन श्रीसूक्ताचे 11 वेळेस पठण करावे.
  • श्रीविष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसूक्त 16 वेळेस आणि विष्णुसहस्त्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते.
Share This News
error: Content is protected !!