पुणे : पुण्यात G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं आता रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली असून त्याचाच प्रत्यय काल आला. एक व्यक्ती रस्त्यावर थुंकल्याचं पाहून त्या व्यक्तीला ती घाण साफ करायला लावण्यात आली. रस्त्यावर थुंकलेली घाण संबंधित व्यक्तीकडून साफ करतानाचा एक व्हिडिओ महापालिकेच्या अधिकृत ट्वीटरवरून पोस्ट करण्यात आलाय.
पुण्यात होणाऱ्या G20 परिषदेसाठी महापालिकेनं जय्यत तयारी सुरू केली असून सर्वत्र रस्ते, फुटपाथ, खांबांची रंगरंगोटी केली जातेय. मोक्याच्या ठिकाणी महागड्या वस्तू वापरून आकर्षक सजावट केली जातेय मात्र एवढ्या सजावटीत एखादी व्यक्ती रस्त्यावर थुंकली तर तिला स्वत:लाच ती घाण साफ करावी लागत आहे.
https://twitter.com/PMCPune/status/1613863587516403713?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1613863587516403713%7Ctwgr%5E74276df0d24857ebed5f7cc5ca77e6cdd2bd9fa7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fsakal-epaper-esakal%2Fvideoviralpunyatilrastyavarthunkanaryalamahapalikeneghyayalalavalpusun-newsid-n461927972%3Fsm%3DY
महापालिकेनं यासंदर्भातील व्हिडिओ एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. दरम्यान, “G20 परिषद व स्वच्छ सर्वेक्षण 2023 निमित्त मुख्य रस्ते, फूटपाथ व दुभाजकांवर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून याअंतर्गत पुणे विद्यापीठ मार्गावर एका व्यक्तीवर कारवाई करून तिनं केलेली घाण त्या व्यक्तीकडूनच स्वच्छ करण्यात आली.” असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय.