#CRIME NEWS : डोंबिवलीत 7 च्या आत घरात ! कपलला पोलीस असल्याची बतावणी करून तरुणीवर अत्याचार

1430 0

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाकुर्ली खाडी किनारा परिसरामध्ये शुक्रवारी एक जोडपं फिरायला गेलं असताना तिथे पोलीस असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी तरुणीवर अत्याचार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी डोंबिवलीला लागून असलेल्या ठाकुरली खाडी परिसरात आपल्या मित्रासोबत ही बारावीमध्ये शिकणारी मुलगी फिरायला गेली होती. यावेळी तिथे दोघेजण आले आणि त्यांनी आम्ही पोलीस असून तुम्ही इथे फिरताय ? ही बाब तुमच्या पालकांना सांगतो असे धमकावले. त्यानंतर मुलीच्या मित्राला पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये घेऊन गेला यावेळी साहेब इथेच येतील. तू त्यांच्याशी बोल असं सांगून त्या तरुणाला तिथेच अडकवून ठेव आणि त्यानंतर तरुणीवर दोघांनीही अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

ही घटना मुलींना घरी सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी विष्णुनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान तरुणांनी या परिसरामध्ये फिरायला जाऊ नये हा परिसर निर्जन असल्यामुळे अशा घटना घडू शकतात असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!