कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये भाजप-शिंदे गटाने उधळला गुलाल; राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खाते देखील उघडले नाही

433 0

कल्याण : कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालाकडे सर्वांचे होतं कारण, आतापर्यंत या दोन्ही ग्रामपंचायतींवर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाची खरी परीक्षा आज होणार होती.

दरम्यान आज कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. निकाल ठाकरे गटाच्या बाजूने तीन,शिंदे गटाचे तीन, तर भाजपच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीला यावेळी एकही जागा मिळवता आली नाही. तर कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतमध्ये काकडपाडा ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

गेरसे – शरद दिवाणे -ठाकरे गट

कोसले- दिलीप बाळाराम पालवी- ठाकरे गट

नांदप -अरुण शेलार- शिंदे गट

कुंदे – अलका शेलार – भाजप

काकडपाडा – महेश अशोक चौधरी -ठाकरे गट

वेहळे – रुचिरा देसले -शिंदे गट

पळसोली -अपेक्षा अनिल चौधरी -शिंदे गट

वासुंद्री – वनिता जाधव अपक्ष

वसतशेलवली – रवींद्र भोईर – भाजप

 

Share This News
error: Content is protected !!