धक्कादायक : पुण्यात भाऊबीजेला माहेरी नेण्याचा हट्ट केला म्हणून पतीने आवळला पत्नीचा गळा

518 0

पुणे : त्या दोघांचे सुरुवातीपासून प्रेम संबंध होते. अल्पवयीन असतानाच त्याने तिला पळून नेले. तरुणीला पळून नेल्याप्रकरणी त्याच्यावर FIR दाखल झाला होता. त्यानंतर तो जामीनावर सुटून आला, आणि पुन्हा त्याने तिला पळून नेले. आई-वडिलांपासून दूर भाड्याच्या खोलीमध्ये हे दोघेजण राहत होते. पण भाऊबीजेच्या दिवशी तिला भावाची आणि घरच्यांची आठवण झाली, म्हणून तिने घरी जाण्याचा हट्ट केला. आणि त्या रागातूनच त्याने थेट तिचा गळा दाबून तिची हत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लोहगाव येथील लेन नंबर ९ मध्ये बुधवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपी चेतन मिसाळ याने नोव्हेंबर 2018 मध्ये तिला सर्वप्रथम पळून नेले होते. त्यानंतर तो जामीनावर सुटून आला आणि पुन्हा एकदा त्याने तिला पळून नेले. 2019 मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे दोघेजण सध्या लोहगाव येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत असताना भाऊबीजेच्या दिवशी या दोघांमध्ये जबरदस्त वादावादी झाल्या. रोजच होणाऱ्या भांडणापेक्षा भाऊबीजेच्या दिवशीचे ते भांडण त्या अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतले. चेतन मिसाळ यांनी त्या मुलीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला आहे.

त्यानंतर ती बेशुद्ध पडली असे कारण सांगून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु घडला प्रकार डॉक्टरांना लक्षात आला आणि त्यांनी ही गोष्ट पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. झाला प्रकार लक्षात येतात चेतन मिसाळ याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चेतन मिसाळ यांनी घडल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!