पुण्यात लग्न समारंभ आटोपला; घरी परतताना काळने घाला घातला; एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

1444 0

लातूर : लातूरच्या चलबुर्गा पाटीजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा एक फोटो समोर आला असून या फोटोमधून अपघाताची भीषणता लक्षात येते. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब निलंगा येथील राहणारी आहेत. पुण्यामध्ये एका लग्नकार्यासाठी हे सर्वजण आले होते. लग्न पार पडल्यानंतर घरी परतत असताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही कार पुलाखाली पलटी झाली अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

या अपघातामध्ये सचिन वडुरकर यांची दोन मुलं, एक पुतण्या आणि एक मेव्हणा यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघीही गंभीर जखमी झाल्या असल्याचे समजत आहे. अपघातातील जखमींवर सध्या लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share This News
error: Content is protected !!