VIDEO : मेदनकरवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची सुपारी देऊन हत्या; पतीसह तिचा खून करणाऱ्या तिघांना अटक

500 0

चाकण : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची एक लाख रुपयांना सुपारी देऊन हत्या करणाऱ्या पतीला तसेच सुपारी घेऊन तिचा खून करणाऱ्या तीन मारेकऱ्यांना चाकण पोलिसांनी अटक केली. चाकण पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या मेदनकरवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली.

आपली पत्नी आशा देशमुख बेपत्ता झाल्याची तक्रार गोरक्ष बबन देशमुख यानं 29 ऑगस्ट 2022 रोजी चाकण पोलीस ठाण्यात दिली होती मात्र त्याच्या जबाबात वारंवार विसंगती आढळून आल्यानं चाकण पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. तपासाअंती गोरख देशमुख यानं आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असं सांगून रोशन गजानन भगत ऊर्फ रॉकी याला एक लाख रुपये देऊन तिच्या खुनाची सुपारी दिल्याची माहिती समोर आली. रोशन भगत यानं त्याचे दोन मित्र देवानंद गजानन मनवर आणि किशोर दत्तात्रेय मुंडे यांच्या मदतीनं 29 ऑगस्ट रोजी आशा देशमुख हिचा तिच्या पती समोर तिच्या मेदनकरवाडी येथील राहत्या घरी खून केला.

खून करण्यापूर्वीच या आरोपींनी तिचा मृतदेह पुरण्यासाठी आळंदी येथील घाटात एक मोठा खड्डा खोदून ठेवला होता. खून केल्यानंतर आरोपीनं तिचा मृतदेह स्कुटीवरून आळंदी येथील घाटापर्यंत नेला आणि खोदलेल्या खड्ड्यात नेऊन पुरला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं समजताच आरोपींनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मृतदेह पूर्ण न जळाल्यानं आरोपींनी तो मृतदेह एका गोणीत भरला आणि ती गोणी दगडाला बांधून केळगाव हद्दीतील डोंगरातील पाझर तलावात फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करून गोरख देशमुख, रोशन भगत आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!