Breaking News

MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : MPSC परीक्षांबाबत मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय; 75 हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

491 0

मुंबई : मंत्रीमंडळ बैठकीत MPSC विद्यार्थ्यांबाबत सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या बाबतचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे 75 हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील वर्षी राज्यातील आरोग्य सेवा परिक्षा व म्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले होते. या घोटाळ्यानंतर या परीक्षा टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांनमार्फत घेण्याचा निर्णय तत्कालीन ठाकरे सरकारने घेतला होता. 10 पदांसाठी घेतली जाणार एकच संयुक्त पुर्व परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त सेवा पुर्व परीक्षा नावाने एकच परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळ्या आयोजित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांची संख्या , एकाच विभागाची पुर्व परीक्षा , वेळ , खर्च वाचवण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने टीसीएस, आयबीपीएस मार्फत संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.

या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परिक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील. माहिती तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञांची राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!