CNG वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून पुण्यात CNG मिळणार नाही ? वाचा सविस्तर

459 0

पुणे : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दार पाहता सीएनजीचा वापर वाढला आहे. पुण्यात जवळपास दोन लाख CNG वर धावणारी वाहने आहेत. अनेक वाहनधारक आपले वाहन सीएनजीवर रूपांतरित देखील करून घेत आहेत.

पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद राहणार आहेत. पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने 1 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपाचा मोठा फटका पुणेकरांना बसणार आहे. विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच पुणे शहर आणि परिसरात CNG च्या दरात चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली. एका किलोसाठी तब्बल 91 रुपये मोजावे लागत आहे.

Share This News
error: Content is protected !!