महत्त्वाची बातमी : विधानसभा पाच आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

253 0

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या पाच आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक तारीख जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुका 5 डिसेंबरला होतील.अर्थात पाच डिसेंबरला मतदान पार पडेल हिमाचल आणि गुजरात निवडणूक मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे.

विधानसभेच्या पाच जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये ओडिशा मधील पदमपुर, राजस्थान मधील सरदारशहर, बिहारमधील कुऱ्हाणी, छत्तीसगडमधील भानु प्रतापूर आणि उत्तर प्रदेशमधील रामपूरचा समावेश आहे. तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या उत्तर प्रदेशातील महिना पुरिया जागेसाठी लढत होणार आहे. मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर आठ डिसेंबरला मतमोजणी होईल.

Share This News
error: Content is protected !!